Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, 20 February 2021

प्रति नुर्सिहवाडी- चिकोडी दत्त मंदिर

 


#प्रति नुर्सिहवाडी-  चिकोडी दत्त मंदिर

ओम श्रीगुरुपरात्परगुरू पादुकाभ्यो नामोनम:

पुण्याचे रघुनाथ नरसिंह मामलेदार हे चिकोडी(बेळगांव)येथे मामलेदार होते, ते चिकोडी न्यायालयात नोकरीस होते,निस्सीम श्री दत्त भक्त असल्याने दर पौर्णिमेस घोड्यावरून श्रीक्षेत्र नुर्सिह वाडीस दर्शनासाठी जात असत.एका पौर्णिमेला दानवाड येथील दुधगंगा नदीला पूर आल्याने,त्यांना घोड्यावरून नदी पार करता आली नाही त्यामुळे पौर्णिमेची वारी खंडित झाली,त्यांना अतीव दुःख झाले,त्यावेळी त्यांनी नदीकाठीच विश्रांती घेतली असता त्यांना महाराजांचा दृष्टांत झाला,इथून पुढे तू माझ्याकडे येऊ नकोस,मीच तुला दर्शन देण्यासाठी ,तुझ्या गावामध्ये प्रकट झालो आहे, ओढ्याशेजारी,औदुंबर वृक्ष आहे,तिथे माझ्या पादुका आहेत,त्या शोधून त्यांची प्रतिष्ठापना करावी,ह्यानंतर मामलेदारांनी चिकोडीत येऊन,अशी जागा कुठे आहे,ह्याची चाचपणी केली असता,चिकोत्रा नदी मानल्या जाणाऱ्या,मोठ्या ओढ्याकाठी,औदुंबराच्या वृक्षाजवळ पादुका मिळाल्या,ह्या पादुका घेऊन जेष्ठ वद्य तृतीयेस, शके१७७७ला त्यांची स्थापना करून मंदिर बांधले,काही काळ त्यांनी नित्य सेवा केली,नंतर बदली झाल्याने,त्यांनी काही पुजाऱ्यांची नियुक्ती केली.

ह्या मंदिरात नित्य रुद्राभिषेक आदी विधी होतात, ह्या मंदिरात -श्रीधरस्वामी,थोरले महाराज,त्यांचे सहपाठी दीक्षित स्वामी,कांचीकामकोटी चे शंकराचार्य आदी सिद्ध येऊन गेल्याचा उल्लेख आहे.

पादुका पाषाणाच्या असून साडेचारशे किलो वजनाच्या आहेत,सोन्याच्या कासवावर त्या प्रतिष्ठापित करण्यात आल्या आहेत.अतिशय पवित्र,सुंदर असे हे मंदिर आहे.चिकोडी येथील मुख्य पुजारी श्री रामचंद्र पुजारी,ह्यांच्यामुळे आमचे दर्शन झाले,योगायोग,आधी औदुंबर, मग नुर्सिहवाडी,श्री स्वामी समर्थ पादुका कार्यक्रम, आणि हे दर्शन झाले,

श्री स्वामी समर्थ

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot