Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 22 December 2020

ब्रम्हदेवाची पुजा का करत नाहीत?

 


-----------------------------------------------------

*ब्रम्हदेवाची पुजा का करत नाहीत?*

----------------------------------------------------


हिंदू धर्मातल्या बऱ्याच ग्रंथांत ब्रह्म देवता का पुजली जात नाही याचे वेगवेगळे वर्णन सापडते.  ह्या कथा राजस्थानात पुष्कर येथे ब्रह्माचे मंदिर आहे तिथे ऐकवल्या  जातात


१. शिव पुराणात जेव्हा शिव ब्रह्म देवतेला सृष्टी जन्मण्याचं आवाहन करतात तेव्हा असलेले विश्वाचे अनाकलनीय रूप पाहून ब्रह्म घाबरून अंधारात लपतात. तेव्हा शक्तीची (अंधारमय कालीची) मदत घेऊन शिव ब्रह्माला शोधतात आणि त्याला श्राप देतात ती त्याची पूजा कधीच होणार नाही. पण जेव्हा ब्रम्ह माफी मागून सृष्टी रचतात तेव्हा शिव त्यांच्यावर दया दाखवून त्यांना तीन आद्य दैवतांमध्ये स्थान मिळेल हा उशाप देतात.


२. विष्णु पुराणात जेव्हा समुद्र मंथन होते तेव्हा लक्ष्मी आणि सरस्वती मंथनातून उत्पन्न होतात. लक्ष्मी स्वतःच विष्णूंना वरते. ह्याचं मंथनातून जन्मलेला नारद ब्रह्मानी आपला मानसपुत्र म्हणून मानलेला असतो. पण तोही विष्णूचा दास होतो. लक्ष्मी आणि नारद विष्णुचे भक्त झालेलं ब्रह्माला बघवत नाही म्हणून ते स्वतःला पत्नी असावी म्हणून सरस्वतीला लग्नाचं साकडं घालतात. परंतु सरस्वती कलेची देवी असल्याने ती निर्माण करणारी  मानली जाते आणि निर्मात्या ब्रह्माला आपला पिता मानत असते आणि ब्रह्माच्या ह्या विनंतीला धुडकावून लावते. ब्रह्मचा हा उताविळपणा आणि मत्सर पाहून विष्णु त्यांना श्राप देतात की त्यांची पूजा होणार नाही.


३. शाक्त पुराणात हीच कथा देवीच्या दृष्टीने सांगितलेली आहे त्यात विष्णु ऐवजी देवी ब्रह्मदेवाला श्राप देते अशी कथा आहे.


४. महाराष्ट्रात श्रीदत्त गुरूंची कथा आहे. माता अनुसया कडे जेव्हा ब्रह्मा विष्णु महेश येतात आणि नग्नावस्थेत जेवण जेऊ घालण्याचं साकडं मागतात तेव्हा ती त्यांना स्वसामर्थ्याने लहान बाळं करून जेऊ घालते. त्यावेळी पत्नी असल्याने लक्ष्मी आणि पार्वती विष्णु आणि शिवासाठी माता अनुसुयेकडे माफी मागतात आणि त्यांना माफी मिळते. परंतु सरस्वती स्वतःला मुलगी मागत असल्याने माफी मागत नाही. म्हणून माफी न मागितल्याचा बदल्यात ब्रह्माला शाप मिळून त्यांची बाल्यावस्थेत तून सुटका होते. पण माता अनुसुयेवर प्रसन्न होऊन तिघे दत्तरुपात तिच्याकडे जन्म घेतात.

1️⃣3️⃣

-----------------------------------------------

*संकलन :- सतीश अलोणी @*

-------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot