*अभीप्सितार्थसिध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः।।*
*सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ॥*
*अर्थ : आपली इष्टकामना सिद्ध होण्यासाठी देव आणि दानव ज्याची पूजा करतात, त्या सर्व विघ्ने दूर करणार्या गणपतीला माझा नमस्कार असो.*
उठा उठा हो सकल जन ।
वाचे स्मरावा गजानन ।
गौरी हराचा नंदन ।
गजवदन गणपति ।। ध्रु ।।
ध्यानी आणुनी सुखमुर्ती ।
स्तवन करा एके चित्ती ।
तो देइल ध्यान मूर्ति ।
मोक्ष सुख सोज्वळ ।। १ ।।
जो निज भक्तांचा दाता ।
वंद्य सुरवरा समर्था ।
त्यासी गातां भवभय चिंता ।
विघ्नवार्ता निवारी ।। २ ।।
तो हा सुखाचा सागर ।
श्री गजानन मोरेश्वर ।
भावे विनवितो गिरिधर ।
भक्त त्याचा होउनी ।। ३ ।।
*शंभोसुता लंबोदरा (गणेश स्तवन* )
शंभोसुता । लंबोदरा
गणनायका । विघ्नेहरा
मांगल्य जे । असते जगी
स्त्रवते सदा । अपुल्या करा ॥
तिमिरातुनी । दुरितास या
द्या मुक्तता । प्राणेश्वरा
तेजातुनी । तेजाकडे
बुद्धीस ने । दुर्वांधरा ॥
सामिप्य द्या । द्या साधुता
सायुज्य द्या । या पामरा
परते करा । दुस्वास या
उजळा त्वरे । भू - अंबरा ॥
*श्रीगणेश स्तवन*
अजं निर्विकल्पं निराकारमेकं
निरानान्दमानान्दं-अद्वैतापूर्णम्
परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं
परब्रह्म-रूपं गणेशं भजेम
आज तुझ्या या अशाश्वत मूर्तरूपाची भक्ती व पुजन करू की तुझ्या त्या नित्य अमर्याद, शाश्वत व निराकार रूपावर प्रेम करू. मला सद्गुणांचा आशीर्वाद देणाऱ्या अरे गणेशा , मला तू दोन्ही रूपांत अत्यंत प्रिय आहेस.
गुणातीतमानं चिदानन्दरुपम्
चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यम्
मुनिन्ध्येयमाकाशारुपं परेशं
परब्रह्म-रूपं गणेशं भजेम
उमेच्या मांडीवर सोंडेशी खेळणाऱ्या तुझ्या गोजिऱ्या रूपाला पहाते तेव्हा मीच साक्षात गौरी होते. इतके लोभस रूप असताना , तुला स्वहस्ताने मोदक भरविल्याशिवाय मला कसे बरे रहावेल !
जगत्-कारणं कारण- ज्ञानरुपं
सुरादिं सुखादिं गुणेशं गणेशं
जगद्व्यापिनं विश्र्ववन्द्यं सुरेशं
परब्रह्म-रूपं गणेशं भजेम
सर्व सत्याचा, प्रार्थनांचा आणि आविष्काराचा प्रकाश आहेस तू , तुझ्याशिवाय कुणाचे स्तवन करू मी !! सर्व जगातील ज्ञानाचे, प्रगतीचे , सुखांचे कलागुणांचे स्त्रोत असूनही मूळ निर्गुण निराकार असलेल्या तुला मी वंदन करते.
असाच दरवर्षी मूर्तरूपाने-मूर्तीरूपाने ये आणि माझ्या ह्रदयातील अज्ञानाचा व माझ्या जीवनातील दुर्भाग्याचा अंधःकार दूर कर , पण अमूर्तरूपातील वरदानासह माझ्या मतीत मात्र नित्य वास कर !!
।। श्री गणेशाय नमः ।।
।। शुभं भवतु ।।
*श्री शंकराचार्य लिखित गणेश स्तवन.*
सुबुद्धी देई तू देवा, दुर्बुद्धी ती कधी नको
मोह तू आवरी माझा, मागणे येवढे तुला!
वासना वासना माझ्या, अंत नाही तया मुळी
हीन ते नाहिसे होवो, मागणे येवढे तुला!
मनीच्या वासना मोठ्या - मागण्या ह्या अनंत
तुला योग्य वाटे - तेची देही!
असोनी आसरा तुझा दु:ख हे भोगितो जगी
असह्य झाले दु:ख तुझे तू नाहिसे करी!
तुझे ते सर्वही राहो, माझे ते सर्वही जावो
तुझे माझे एक होवो, माझे तुझ्यात लीन होवो!
मोरया मोरया मी बाळ तान्हे |
तुझीच सेवा करू काय जाणे ||
अन्याय माझे कोट्यानुकोटी |
मोरेश्वरा बा तू घाल पोटी || १ ||
पिता माता बंधू तुजवीण कोण असे मजला |
बहु मी अन्यायी परि सकलही लाज तुजला ||
न जाणे मी काही जप तपपुजा
साधन विधी कृपादृष्टी पाहे
शरण तुज आलो गणपती || २ ||
वळेना हि जिव्हा धड
मज तुझे नामही न ये |
धरावे त्वा हाती
अभयवरदा पूर्ण अभये ||
अनाथांच्या नाथा झडकरी
करी आस पुरती || कृपा || ३ ||
भुकेलो केव्हाचा हृदय
निष्ठुर न करी झणी |
प्रसादाचा लाडू कवळ बरवा घाल वदनी |
सदा ब्रह्मानंद मग तुजपुढे नाचत प्रीती || कृपा || ४ ||
बहु बोलो काही परम सुखदा
मंगलनिधी मला तारी आता
अति कठीण संसार जलधी |
स्वभावे गोसावीसुत करितसे हेची विनंती || कृपा || ५ ||
गजवदना सुखसदना शंभुनंदना । विघ्न हरुनि निघ्न करुनिं रमविं मम मना ॥ध्रु०॥
कृतयुगिं तूं पंक्तिहस्त सित विनायक । सिंहवदन, विघ्नदहन, भजक पोषक ।
त्रेतायुगिं मयुरसंगिं मयुरपालक ॥चाल॥ देवा, भावा, भावा ।
जाणसि तूं, षट्कर तूं । सद्धेतु । स्वर्णशोभना ॥१॥
द्वापारीं गजवदना, आखुवाहना । रक्तवर्ण, शूर्पकर्ण, परम शोभना ॥
पाशांकुशरदवरकर विघ्नभंजना ॥चाल॥ गणपा । पापा । परिहरिसी ।
वर देसी । भय हरिसी । रक्षिसी जना ॥२॥
कलियुगिं तो तूंच साच येथ प्रगटसी ।
हो उनियां द्विभुज अश्वपृष्ठि बैससी । धूम्रवर्ण तूर्ण भक्तकाम पुरविसी ॥चाल॥
दरदा । वरदा । परदा । विघ्नहरा । भक्तवरा । तारिं निज जना ॥३॥
*जय जय श्रीगजवदना , हे गणर...*
जय जय श्रीगजवदना, हे गणराया, गौरिकुमारा हो
करुणाकर सुकुमारा, महारणधीरा, गुण गंभिरा, हो ॥ध्रु०॥
शेंदुरवक्त्र-सुरंगित, अनुपम दोंदिल, रुप साजरें हो
शुंडादंड सुशोभित, सदा मद गंडस्थळिं पाझरे हो
कनक-कटक-मुकुटाच्यावर जडिताचे चमकति हिरे हो
श्रीकृष्णागरु चंदन अंगीं उटि मर्दित केशरें हो
मस्तकिं धरिसी बरवा हिरवा मरवा दुर्वांकुरा हो ॥जय जय० ॥१॥
कसित पितांबर पिवळा, गळां हार पुष्पांचे डोलती हो
तळपति कुंडलें कर्णीं, पंखे कर्णांचे हालती हो
सिद्ध, सरस्वति, ऋद्धि, सिद्धि, बुद्धीनें चालती हो
रुणझुण पैंजण चरणीं, वाणि गीर्वाणी, बोलती हो
वंदिति सुरनर पन्नग, निजगण वारिति शिरिं चामरें हो ॥जय० ॥२॥
सकळ मंगळारंभीं, सकळहि चिंतित चिंतामणी हो
चिंतन करि चतुरानन, गुणगण वर्णी दशशत फणी हो
नामस्मरणें पळती, कोटी विघ्नांच्या त्या श्रेणी हो
उद्धरि भक्त न हलतां, किंचित नेत्राची पापणी हो
त्राता तूं सर्वत्रां, रविशशिइंद्रासह सुरवरां हो ॥जय जय० ॥३॥
शरणांगत मी आलों, तुज फरशांकुश-मोदक-धरा हो
धांवे, पावे, कृपा कर सत्वर, यावें लंबोदरा हो
ओवाळिन आरती उजळुन दीपावळी कर्पूरा हो
वाहुनिया पुष्पांजलि पदयुग वंदिन जोडुन करा हो
विष्णुदास म्हणे, करी पावन वर देउनि किंकरा हो ॥जय जय० ॥४॥
No comments:
Post a Comment