Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 6 November 2020

नीलसरस्वती स्तोत्रम्

 


🌹 *नीलसरस्वती स्तोत्रम्* 🌹

                    ( मराठी अर्थासह )



*घोररूपे महारावे सर्वशत्रुभयङ्करि I* 

*भक्तेभ्यो वरदे देवि त्राहि मां शरणागतम् II १ II* 

*ॐ सुरासुरार्चिते देवि सिद्धगन्धर्वसेविते I* 

*जाड्यपापहरे देवि त्राहि मां शरणागतम् II २ II* 

*जटाजूटसमायुक्ते लोलजिह्वान्तकारिणि I* 

*द्रुतबुद्धिकरे देवि त्राहि मां शरणागतम् II ३ II* 

*सौम्यक्रोधधरे रूपे चण्डरूपे नमोSस्तु ते I*

*सृष्टिरूपे नमस्तुभ्यं त्राहि मां शरणागतम् II ४ II* 

*जडानां जडतां हन्ति भक्तानां भक्तवत्सला I* 

*मूढतां हर मे देवि त्राहि मां शरणागतम् II ५ II* 

*वं ह्रूं ह्रूं कामये देवि बलिहोमप्रिये नमः I* 

*उग्रतारे नमो नित्यं त्राहि मां शरणागतम् II ६ II* 

*बुद्धिं देहि यशो देहि कवित्वं देहि देहि मे I* 

*मूढत्वं च हरेद्देवि त्राहि मां शरणागतम् II ७ II* 

*इन्द्रादिविलसद्द्वन्द्ववन्दिते करुणामयि I* 

*तारे ताराधिनाथास्ये त्राहि मां शरणागतम् II ८ II* 

*अष्टम्यां च चतुर्दश्यां नवम्यां यः पठेन्नरः I* 

*षण्मासैः सिद्धिमाप्नोति नात्र कार्या विचारणा II ९ II* 

*मोक्षार्थी लभते मोक्षं धनार्थी लभते धनम् I*

*विद्यार्थी लभते विद्यां तर्कव्याकरणादिकम् II १० II* 

*इदं स्तोत्रं पठेद्यस्तु सततं श्रद्धयाSन्वितः I* 

*तस्य शत्रुः क्षयं याति महाप्रज्ञा प्रजायते II ११ II* 

*पीडायां वापि संग्रामे जाड्ये दाने तथा भये I* 

*य इदं पठति स्तोत्रं शुभं तस्य न संशयः II १२ II* 

*इति प्रणम्य स्तुत्वा च योनिमुद्रां प्रदर्शयेत् II १३ II*

*II इति नीलसरस्वती स्तोत्रं संपूर्णं II*


*नीलसरस्वती स्तोत्र मराठी अर्थ:*


१) भयानक रूप असणारी, घोर निनाद करणारी, सर्व शत्रुंचा नाश करणारी आणि भक्तांना वर देणारी अशा देवी मी तुला शरण आलो आहे माझे रक्षण कर. 

२) देव आणि दानव जीची पूजा करतात आणि सिद्ध आणि गंधर्व जीची सेवा करतात आणि जी पापांचे हरण करते अशा देवी मी तुला शरण आलो आहे. माझे तूं रक्षण कर. 

३) जटाजूटाने सुशोभित, चंचल जिभेला अन्तरमुख करणारी आणि बुद्धीला धारदार बनविणारी अशा देवी मी तुला शरण आलो आहे. माझे तूं रक्षण कर. 

४) अल्पसा राग करणारी, उत्तम विग्रह असणारी, प्रचंड रूप धारण करणारी हे देवी तुला माझा नमस्कार आहे. तुला शरण आलेल्या माझे तूं रक्षण कर. 

५) हे देवी तूं मूर्खांच्या मूर्खतेचा नाश करतेस. भक्तांसाठी तूं भक्तवत्सला आहेस. हे देवी ! तूं माझ्या मूर्खपणाचा नाश कर आणि तुला शरण आलेल्या माझे तूं रक्षण कर. 

६) वं ह्रूं ह्रूं या बिजमंत्रस्वरूप असलेल्या हे देवी! मी आपल्या दर्शनाची इच्छा करतो. बळी व होमाने प्रसन्न होण्यार्या हे देवी तुला माझा नमस्कार आहे. उग्र संकटांतून तारणार्या हे देवी! हे उग्रतारे ! आपल्याला नेहमी माझा नमस्कार आहे. तुला शरण आलेल्या माझे तूं रक्षण कर. 

७) हे देवी ! तूं मला बुद्धि दे, कीर्ति दे, कवित्वशक्ती दे आणि माझ्या मूर्खतेचा नाश कर. तुला शरण आलेल्या माझे तूं रक्षण कर. 

८) इंद्र आणि इतर देव यांनी वंदिलेली, शोभायुक्तचरण असणारी, करुणेने भरलेली, चंद्रासारखे मुखमंडल असणारी आणि जगाला तारणारी हे भगवती तारा ! तुला शरण आलेल्या माझे तूं रक्षण कर. 

९) जो कोणी अष्टमी, नवमी तसेच चतुर्दशी तिथीला या स्तोत्राचा पाठ करतो. तो सहा महिन्यांत सिद्धी प्राप्त करतो. यांत संशय नाही. 

१०) या स्तोत्राचा पाठ केल्यावर मोक्षाची इच्छा करणारास मोक्ष, धनाची इच्छा करणारास धन, विद्येची इच्छा करणारास विद्या आणि तर्क व्याकरण इत्यादीचे ज्ञान प्राप्त होते. 

११) जो मनुष्य पूर्ण भक्ती भावाने या स्तोत्राचा सतत पाठ करतो, त्याच्या शत्रुंचा नाश होतो आणि त्याला महान बुद्धि प्राप्त होते. 

१२) जो माणूस संकटांत, युद्धांत, मूर्खपणांत, दानाच्या वेळी किंवा भयग्रस्त असतांना या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे कल्याण होते, यांत संशय नाही. 

१३) अशा प्रकारे स्तुती करून नंतर देवीला नमस्कार करून तीला योनीमुद्रा दाखवावी. 

अशा प्रकारे हे नीलसरस्वती स्तोत्र संपूर्ण झाले. 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot