Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 18 November 2020

सरस्वती कवच

 


❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

                 *🔸सरस्वती कवच🔸* 


*कवचस्यास्य विप्रेन्द्र ऋषिरेव प्रजापतिः । स्वयं छन्दश्र्च बृहती देवता शारदाम्बिका ॥ १ ॥(या कवचाचे ऋषि स्वतः प्रजापति आहेत. याचा छंद बृहती आहे. देवता शारदाम्बिका आहे.)*


*सर्वतत्वपरिज्ञानसर्वार्थ साधनेषु च । कवितासु च सर्वासु विनियोगः प्रकीर्तितः ॥ २ ॥(सर्व तत्वांचे संपूर्ण ज्ञान, सर्व अर्थची साधनें आणि कविता शक्ति यांच्या प्राप्ती करतां याचा विनियोग सांगितला आहे.)*


*ॐ श्रीं हृीं सरस्वत्यै स्वाहा शिरो मे पातु सर्वतः । ॐ श्रीं वाग्देवतायै स्वाहा भालं मे सर्वदाऽवतु ॥ ३ ॥ (ॐ श्रीं हृीं सरस्वत्यै स्वाहा माझ्या डोक्याचे सर्व बाजूंनी रक्षण करो. ॐ श्रीं वाग्देवतायै स्वाहा माझ्या कपाळाचे सर्वदा रक्षण करो.)*


*ॐ र्‍हीं सरस्वत्यै स्वाहेति श्रोत्रे पातु निरन्तरम् । ॐ श्रीं र्‍हीं भगवत्यै स्वाहा नेत्रयुग्मं सदाऽवतु ॥ ४ ॥ (ॐ हृीं सरस्वत्यै स्वाहा माझ्या कानांचे रक्षण करो. ॐ श्रीं हृीं भगवत्यै स्वाहा माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो.)*


*ॐ एैं र्‍हीं वाग्वादिन्यै स्वाहा नासां मे सर्वदाऽवतु । ॐ र्‍हीं विद्याधिष्ठातृदेव्यै स्वाहा ओष्ठं सदाऽवतु ॥ ५ ॥(ॐ एैं हृीं वाग्वादिन्यै स्वाहा माझ्या नाकाचे नेहमी रक्षण करो. ॐ हृीं विद्याधिष्ठातृदेव्यै स्वाहा माझ्या ओठांचे नेहमी रक्षण करो.)*


*ॐ श्रीं र्‍हीं ब्राह्नण्यै स्वाहेति दन्तपंक्तिं सदाऽवतु । ॐ ऐमित्येकाक्षरो मन्त्रो मम कण्ठं सदाऽवतु ॥ ६ ॥ (ॐ श्रीं ब्राह्मण्यै स्वाहा माझ्या दातांचे रक्षण करो. ॐ ऐं हा मंत्र माझ्या कंठाचे नेहमी रक्षण करो.)*


*ॐ श्री र्‍हीं पातु मे ग्रीवां स्कन्धौ मे ॐ श्रीं सदाऽवतु । ॐ विद्याधिष्ठातृदेव्यै स्वाहा वक्षः सदाऽवतु ॥ ७ ॥ (ॐ श्रीं हृीं माझ्या मानेचे नेहमी रक्षण करो. ॐ श्रीं माझ्या खांद्यांचे नेहमी रक्षण करो. ॐ विद्याधिष्ठातृदेव्यै स्वाहा माझ्या वक्षांचे नेहमी रक्षण करो.)*


*ॐ र्‍हीं विद्यास्वरुपायै स्वाहा मे पातु नाभिकाम् । ॐ र्‍हीं क्लीं वाण्यै स्वाहेति मम हस्तौ सदाऽवतु ॥ ८ ॥ (ॐ हृीं विद्यास्वरुपायै स्वाहा माझ्या नाभीचे नेहमी रक्षण करो. ॐ हृीं क्लीं वाण्यै स्वाहा माझ्या दोन्ही हातांचे रक्षण करो.)*


*ॐ सर्ववर्णात्मिकायै स्वाहा पादयुग्मं सदाऽवतु । ॐ वाग्धिष्ठातृदेव्यै स्वाहा सर्वं सदाऽवतु ॥ ९ ॥ (ॐ सर्ववर्णात्मिकायै स्वाहा माझ्या दोन्ही पायांचे नेहमी रक्षण करो. ॐ वाग्धिष्ठतृदेव्यै स्वाहा माझ्या सर्वांगाचे नेहमी रक्षण करो.)*


*ॐ सर्वकंठवासिन्यै स्वाहा प्राच्यां सदाऽवतु । ॐ सर्वजिह्वाग्रवासिन्यै स्वाहाऽग्निदिशिं रक्षतु सर्वदा ॥ १० ॥ (ॐ सर्वकंठवासिन्यै स्वाहा माझे पूर्वेकडून रक्षण करो. ॐ सर्वजिह्वाग्रवासिन्यै स्वाहा माझे आग्नेय दिशेकडून रक्षण करो.)*


*ॐ ऐं र्‍हीं श्रीं क्लीं सरस्वत्यै बुधजनन्यै स्वाहा । सततं मन्त्रराजोऽयं दक्षिणे मां सदाऽवतु ॥ ११ ॥ (ॐ ऐं हृीं श्रीं क्लीं सरस्वत्यै बुधजनन्यै स्वाहा हा मंत्रराज माझे दक्षिणेला रक्षण करो.)*


*ॐ ऐं र्‍हीं श्रीं त्र्यक्षरो मन्त्रो नैर्ऋत्यां सर्वदाऽवतु । ॐ ऐं जिह्वाग्रवासिन्यै स्वाहा मां वारुणेऽवतु ॥ १२ ॥ (ॐ ऐं हृीं श्रीं हा तीन अक्षरी मंत्र माझे नैर्ऋत्येला रक्षण करो. ॐ ऐं जिह्वाग्रवासिन्यै स्वाहा माझे पश्र्चिमेला रक्षण करो.)*


*ॐ सर्वाम्बिकायै स्वाहा वायव्ये मां सदाऽवतु । ॐ ऐ श्रीं क्लीं गद्यवासिन्यै स्वाहा मामुत्तरेऽवतु ॥ १३ ॥ (ॐ सर्वाम्बिकायै स्वाहा माझे वायव्येला रक्षण करो. ॐ ऐं श्रीं क्लीं गद्यवासिन्यै स्वाहा माझे उत्तरेला रक्षण करो.)*


*ॐ ऐं सर्वशास्त्रवासिन्यै स्वाहेशान्यां सदाऽवतु । ॐ र्‍हीं सर्वपूजितायै स्वाहा चोर्ध्वं सदाऽवतु ॥ १४ ॥ (ॐ ऐं सर्वशास्त्रवासिन्यै स्वाहा माझे ईशान्येला रक्षण करो. ॐ हृीं सर्व पूजितायै स्वाहा माझे उर्ध्वेकडून नेहमी रक्षण करो.)*


*ॐ र्‍हीं पुस्तकवासिन्यै स्वाहाऽधो मां सदाऽवतु । ॐ ग्रन्थबीजम्स्वरुपायै स्वाहा मां सर्वतोऽवतु ॥ १५ ॥ (ॐ हृीं पुस्तकवासिन्यै स्वाहा माझे अध (खालची दिशा) दिशेला नेहमी  रक्षण करो. ॐ ग्रंथबीज स्वरुपायै स्वाहा माझे नेहमी सगळीकडे रक्षण करो.)*


*इति ते कथितं विप्र ब्रह्ममन्त्रौघविग्रहम् । इदं विश्रजयं नाम कवचं ब्रह्मरुपकम् ॥ १६ ॥* *(हे विप्रा, मी तुला हे विश्र्वजय नावाचे कवच सर्व विग्रहासह सांगितले.)*

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot