*बावनश्लोकी श्रीगुरुचरित्र*
जगद्वंद्य अवधूत दिगंबर,
*दत्तात्रय गुरु तुम्हीच ना ?*
अनन्यभावे शरणांगत मी,
*भवभय वारण तुम्हीच ना ?*
कीर्तवीर्य यदु परशुरामही,
*प्रबोधिले गुरु तुम्हीच ना ?*
स्वामी जनार्दन एकनाथ तरि,
*कृतार्थ केले तुम्हीच ना ?*
नवनारायण सनाथ करुनी,
*पंथ निर्मिला तुम्हीच ना ?*
मच्छीन्द्रादि जती प्रवृत्त केले,
*जन उद्धारा तुम्हीच ना ?*
दासोपंता घरी रंगले,
*परमानंदे तुम्हीच ना ?*
नाथ सनदिचे चोपदार तरि,
*श्रीगुरू दत्ता तुम्हीच ना ?*
युगायुगी निजभक्त रक्षणा,
*अवतरता गुरु तुम्हीच ना ?*
बलोन्मत्त पिशाच वृत्ती,
*धारण करता तुम्हीच ना ?*
स्नान काशिपुरी चंदन पंढरी,
*संध्या सागरी तुम्हीच ना ?*
करुनी भिक्षा करिविरी भोजन,
*पंचाळेश्वरि तुम्हीच ना ?*
तुळजापुरी करशुद्धी तांबुल,
*निद्रा माहुरी तुम्हीच ना ?*
करुनी समाधी मग्न निरंतर,
*गिरनारी गुरु तुम्हीच ना ?*
विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले,
*पीठापुरी गुरु तुम्हीच ना ?*
श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती,
*करंजनगरी तुम्हीच ना ?*
जन्मताच ओंकार जपुनी,
*मौन धरियेले तुम्हीच ना ?*
मौजी बंधनी वेद वदुनी,
*जननी सुखविली तुम्हीच ना ?*
चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा,
*आश्रम घेउनी तुम्हीच ना ?*
कृष्ण सरस्वति सद्गुरू वंदुनी,
*तिर्था गमले तुम्हीच ना ?*
माधवारण्य कृतार्थ केला,
*आश्रम देऊनी तुम्हीच ना ?*
पोटशुळाची व्यथा हरोनी,
*विप्र सुखविला तुम्हीच ना ?*
वेल उपटोनी विप्रा दिधला,
*हेमकुम्भ गुरु तुम्हीच ना ?*
तस्कर वधुनी विप्र रक्षिला,
*भक्तवत्सल तुम्हीच ना ?*
विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला,
*निष्ठा देखुनी तुम्हीच ना ?*
हीन जिव्हा वेदपाठी केला,
*सजीव करुनी तुम्हीच ना ?*
वाडी नरसिंह औदुंबरही,
*वास्तव्य करुनी तुम्हीच ना ?*
भीमा अमरजा संगमी आले,
*गाणगापुरी गुरु तुम्हीच ना ?*
ब्रम्हमुहूर्ती संगमस्थानी,
*अनिष्ठानि रत तुम्हीच ना ?*
भिक्षा ग्रामी करुनी राहतां,
*मध्यान्ही गुरु तुम्हीच ना ?*
ब्रम्हराक्षसा मोक्ष देऊनी,
*उद्धरीले मठी तुम्हीच ना ?*
वांझ महिषी दुभविले,
*फुलविले शुष्क काष्ठ तुम्हीच ना ?*
नंदीनामा कुष्ठी केला,
*दिव्य देही गुरु तुम्हीच ना ?*
त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनी,
*कुमशी ग्रामी तुम्हीच ना ?*
अगणीत दिधले धान्य कापुनी,
*शूद्रा शेत गुरु तुम्हीच ना ?*
रत्नाईचे कुष्ट दवडिले,
*तीर्थे वर्णित तुम्हीच ना ?*
आठही ग्रामी भिक्षा केली,
*दिपवाळी दिनी तुम्हीच ना ?*
भास्कर हस्ते चारसहस्त्रा,
*भोजन दिधले तुम्हीच ना ?*
निमिषमात्रे तंतुक नेला,
*श्री शैल्यासी तुम्हीच ना ?*
सायंदेवा काशी यात्रा,
*दाखविली गुरु तुम्हीच ना ?*
चांडाला मुखी वेद वदविले,
*गर्व हरया तुम्हीच ना ?*
साठ वर्षे वांझेसी दिधले,
*कन्या पुत्रही तुम्हीच ना ?*
कृतार्थ केला मानस पूजनी,
*नर केसरी गुरु तुम्हीच ना ?*
माहूरचा सतिपती उठवोनी,
*धर्म कथियला तुम्हीच ना ?*
रजकाचा यवनराज बनवुनी,
*उद्धरिला गुरु तुम्हीच ना ?*
अनन्यभावे भजता सेवक,
*तरतिल वदले तुम्हीच ना ?*
कर्दळीवनीचा बहाणा करुनी,
*गाणगापुरी स्थित तुम्हीच ना ?*
निर्गुण पादुका दृष्य ठेऊनि,
*गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना ?*
विठाबाईचा दास मूढ परि,
*अंगिकारिला तुम्हीच ना ?*
आत्मचिंतनी रमवा निशिदिनी,
*दिनानाथ गुरु तुम्हीच ना ?*
No comments:
Post a Comment